शॉटगन शूटिंग स्पर्धेत देवळेकर भगिनींची नेत्रदीपक कामगिरी, वराला रौप्य तर कार्तिकी देवळेकर हिला कांस्यपदक

रत्नागिरी :
पुणे बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र रायफल संघटना आयोजित २८ व्या कॅप्टन इजिकल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेमध्ये देवळेकर भगिनींनी नेत्रदीपक कामगिरी केली. वरा मानस देवळेकर हिने ज्युनियर डबल ट्रॅप शूटिंग मध्ये रौप्यपदक तर कार्तिकी मानस देवळेकर हिने कांस्यपदक पटकावले.

ही स्पर्धा २६ ते २८ जुलै दरम्यान पुणे येथे खेळवण्यात आली होती. याच स्पर्धेत मैत्री मनोज साळवी हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या तिघींचीही प्री नॅशनलसाठी निवड करण्यात आली आहे. या तिघीही महाराष्ट्र रायफल संघटनेचे नेतृत्व करणार आहेत.

या तिघींना देखील बालेवाडी रेंज प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांनी प्रशिक्षण दिले. तसेच हेमंत बालवडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिद्धांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी प्रसिद्ध उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी अभिनंदन केले व प्री नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button