
वाटद एमआयडीसी प्रकल्पाला रत्नागिरी क्रेडाईचा पाठिंबा, पालकमंत्र्यांची भेट घेवून केला पाठिंबा जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी क्रेडाई रत्नागिरीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले. क्रेडाई रत्नागिरीने या प्रकल्पाच्या तातडीने अंमलबजावणीची मागणी केली असून, हा प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे म्हटले आहे.
पालकमंत्री सामंत नाट्यगृहात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी क्रेडाई रत्नागिरीचे माजी अध्यक्ष नित्यानंद भुते, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसंयोजक दीपक साळवी, खजिनदार महावीर जैन, बोर्ड सदस्य दिनेश जैन, समीर सावंत, सुमित ओसवाल, आनंद चौगुले, युथ विंगचे संयोजक राहुल भोसले तसेच सदस्य वीरेंद्र वणजू व अनिल चन्ने उपस्थित होते. या सर्व पदाधिकार्यांनी सामंत यांची भेट घेऊन वाटद एमआयडीसी प्रकल्पाबाबत चर्चा केली.www.konkantoday.com