
रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या ’त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध लागेना
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा. नाशिक मूळ रा. हरियाणा) असे या तरुणीचे नाव आहे. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुखप्रित हिने आत्महत्या केल्याचे पोलिसात नोंदविण्यात आले होते.
सुरुवातीच्या दिवसंत पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलीस, माऊडेनिअर्सची टिम, एनडीआएफ यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व संसाधने वापरुनही या तरुणीचा शोध लागेला नाही. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक येथे बँकेत नोकरीला असणारी सुखप्रित ही आपल्या मित्राला भेटण्यासाठी २९ जून रोजी रत्नागिरीत आली होती. यानंतर सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तिने आपले चप्पल आणि जॅकेट बाजूला ठेवले आणि रेलिंगच्या पुढे गेली. तसेच यानंतर तिने कठड्यावरुन उडी घेत आत्महत्या केलीwww.konkantoday.com