जिल्ह्यात १ ते ७ आॕगस्ट महसूल सप्ताह


रत्नागिरी, दि. 30 : 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहा साजरा करण्यात येत आहे.
1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” महसूल संवर्गातील कार्यत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र समारंभ, 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबतचा कार्यक्रम, 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्ते मोजणी करुन अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियान राबविणे, 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील DBT न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटी देऊन DBT करुन घेणे, 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकुल करणे/सरकार जमा करणे) निर्णय घेणे, 7 ऑगस्ट रोजी M-sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पुर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ.
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दिनांक 1 ऑगस्ट, हा दिवस “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button