
चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदारांची रस्ते, गटारे आणि १७० कोटींची बिले प्रलंबित !
चिपळूण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदारांची तब्बल १७० कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत आणि विकासकामे गतीला येण्याऐवजी थांबलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उदासीनतेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सार्या गंभीर प्रश्न संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार विचारधारा) तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना थेट निवेदन देऊन जाब विचारला आहेतालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला झाडाझुडपं आणि गवताची दाटी झाली असून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे आजारांचा फैलाव आणि नागरिकांना त्रास या दोन्ही गोष्टी वाढल्या आहेत.www.konkantoday.com