
गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष
रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेमार्गावर मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी २४ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत आठवड्यातून एकदा धावेल.
गाडीचा सविस्तर तपशील असा : ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष दर रविवारी म्हणजेच २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी रोजी मडगाव जंक्शन येथून सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१००३ ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी मडगाव जंक्शनला पोहोचेल.
या प्रवासात ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर या स्थानकांवर थांबेल.
या गाडीला एकूण २० एलएचबी कोच असून, तुमची रचना २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ अशी असेल.
उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचाला प्रवासांनी घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.