
क्रीडा स्पर्धांचे आयोजनसंघटनांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळणार
रत्नागिरी, दि.30 ) : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा व विभागस्तरावर विविध खेळांचा समावेश असेल. या स्पर्धांच्या आयोजनासाठी क्रीडा संघटनांना तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य देण्यात येईल. या आयोजनासाठी आवश्यक साहित्य, निवास व्यवस्था, मुलामुलींसाठी चेजिंग रूम आणि स्वच्छतागृहे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये समाविष्ट खेळ पुढीलप्रमाणे आहेत. अष्टे डु अखाडा, युनिफाईड, कुडो, स्पिडबॉल, टेंग सु डो, फिल्ड आर्चरी, मोटेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोरबॉल, थायबॉक्सिंग, हाफ किडोबॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शेल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल कॉर्फ़बॉल, टेबल सॉकर, हुप कॉन दो, युग मुं दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल ग्रॅम्पलिंग, पेट्याक्यू, लंगडी, जपरोर, स्पोर्टडान्स, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शेल आर्ट, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शेल आर्ट, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट. विभागस्तरीय स्पर्धांमध्ये समाविष्ट खेळ फिल्ड आर्चरी, सुपर सेवन क्रिकेट, सिलंबम, लगोरी, बीच व्हॉलीबॉल, युग मुं दो.
जिल्ह्यातील वरील खेळप्रकारांच्या विविध क्रीडा संघटनांनी जिल्हा व विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाकरीता नोंदणी प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र, तांत्रिक व आर्थिक सहकार्याचे पत्र आणि स्पर्धा आयोजनाचे मागणी पत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कळविले आहे.