
१ ऑगस्टपासून मासेमारी सुरू, मच्छीमारांमध्ये लगबग; बोटींची डागडुजी
मासेमारी बंदीचा कालावधी संपुष्टात आला असून १ ऑगस्टपासून होणार्या मासेमारीसाठी हर्णे, पाजपंढरी येथील मच्छीमारांमध्ये लगबग पहायला मिळत आहे. पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
हर्णे बंदरात लहान मोठ्या ९०० ते १ हजार बोटी मासेमारी करतात १ जून ते ३१ जुलै हा माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने या महिन्यांमध्ये मासेमारी बंद ठेवण्यात येते. परंतु यावर्षी अनधिकृतरित्या मुंबई येथील मासेमारी बोटींनी मासेमारी केली. शिवाय दरवर्षी मासेमारीला नैसर्गिक आपत्तीमुळे ब्रेक लागतोच शिवाय एलईडी, फास्टरबोटींमुळे पारंपारीक रित्या मासेमारी करणार्या स्थानिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होते. परंतु या फास्टर व एलईडी बोटींवर प्रशासन कायमचा बंदोबस्त करत नसल्याचे पारंपरिक व स्थानिक मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com