
हातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याने ठप्प झालेली वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता, अपघात ग्रस्त टँकर मधीलगॅस दुसऱ्या टँकर मध्ये स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण,______
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठ्याजवळ सोमवारी रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टँकरमधून सुरू झालेली गॅस गळती लक्षात घेता तातडीने मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले . अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतर करण्यासाठी विशेष ईआरबी वाहन मागविण्यात आले होते या पथकाने अपघातग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये हलवण्याचे काम पूर्ण केले आहे
वाहतूक थांबविल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही काळातच या मार्गावरून वाहतूक सुरू होईल असा अंदाज आहे