
शिवबंधन परिक्रमा अंतर्गत आज रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकारणी बैठक…,_____
शिवसेना उपनेते तथा मा. आमदार श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने व संपर्कप्रमुख श्री सहदेव बेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा मा.मुख्यमंत्री मा.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात शिवबंधन परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता जयेश मंगल कार्यालय, शासकीय विश्रामगृह माळनाका समोर, थिबा पॉईंट रोड, रत्नागिरी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन,
श्री दत्तात्रय कदम*
रत्नागिरी जिल्हाप्रमुख (दक्षिण) यांनी केले आहे