
मुंबई गोवा महामार्गावरीलहातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याने ठप्प झालेली आता वाहतूक सुरू ,,______
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठ्याजवळ सोमवारी रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टँकरमधून सुरू झालेली गॅस गळती लक्षात घेता तातडीने मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या परिस्थितीवर हाताळून काल रात्री बंद पडलेली वाहतूक सुरू करण्यात यश मिळवले आहे आहे आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यास प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे गेले अनेक तास सर्वच यंत्रणांनी पाठपुरावा व युद्ध पातळीवर काम सुरू ठेवले होते