
माचाळच्या ग्रामस्थांसाठी तरूणांच्या पुढाकारातून वैद्यकीय सेवा सुरू
रोजगारासाठी मुंबई व चेन्नईसारख्या शहरांत स्थायिक असलेल्या माचाळ गावातील तरुणांनी आपल्या गावातील आरोग्यसेवेची गरज ओळखून उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. त्यांच्या पुढाकारातून आता डॉ. साईनाथ तुरंबेकर हे प्रत्येक गुरुवारी पालूमधील माचाळ येथे येऊन वैद्यकीय सेवा देणार आहेत.
डॉ. तुरंबेकर हे दर गुरुवारी माचाळचे गावकार पांडुरंग पाटील यांच्या घरी संध्याकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करतील. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माचाळ येथील ग्रामस्थांना उपचारासाठी पालू व प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी याठिकाणी जावे लागते. त्यामुळे या आरोग्य सेवेमुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
www.konkantoday.com