
घरकुला’चे हप्ते थकल्याने लाभार्थ्यांना डोकेदुखी वाढली.
महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ही इतर मागास प्रवर्गासाठी आहे. मात्र या योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थ्यांचे काम पूर्ण होऊन कामाप्रमाणे जमा होणारे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. अनेक लाभार्थ्यांनी उधारीवर साहित्य आणले असल्याने आणि वेळेत हप्ते जमा होत नसल्याने लाभार्थ्यांची डोकेदुखी वाढत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांतील काहींची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर काही घरांवर छप्पर घालण्यात आले आहे. परंतु यातील काहीना करार केल्यानंतर येणारा पंधरा हजार रुपयाचा हप्ता आला. मात्र लाभार्थ्यांनी दीड-दोन लाख खर्च करून इमारत उभी केली आहे. तर काहीना पंचेचाळीस हजारांचा दुसरा हप्ता आला असून काहींना तीन हप्ते घेऊन पुढच्या रक्कमेची वाट पहावी लागत आहे.
www.konkantoday.com