
खड्ड्यांमुळे अवजड वाहतूक देवरुख दाभोळमार्गे सुरू, वाहतूक वाढल्याने रस्त्याची होत आहे दुरावस्था
पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी झाली असून व्यापार्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने संगमेश्वरमार्गे गोव्याकडे जाणारी अवजड वाहने आता वळविण्यात आली आहेत. मात्र त्यामुळे संगमेश्वर ते देवरुख मार्गावरही बाहतूक भार वाढला आहे. या मार्गावरदेखील मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला असून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन आणि सार्वजनिक विभागाकडून बांधकाम तत्काळ उपाययोजना करून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.www.konkantoday.com