
खड्डेदादा, आता पुन्हा येऊ नका, मनसे वाहतूक सेनेने केले आगळेवेगळे आंदोलन
खड्डेदादा या वर्षी पण तुम्ही आलात? मे महिन्यांपूर्वी तुमचे नामो निशाण सार्वजनिक बांधकामच्या कर्तबगार अधिकार्यांनी नवीन काम करून मिटविले होते… अहो तुमच्या जीवावर हे अधिकारी-ठेकेदार पोट भरतात आणि आमचा चालक या खड्ड्यात अडकून मरतो… आता पुन्हा येऊ नका, असे गार्हाणे घालत मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी रविवारी चक्क खड्ड्यांची पूजा केली. चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळी येथील या अनोख्या आंदोलनाने, सा. बां. विभागाच्या कारभाराची लख्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली.
गुहागर-चिपळूण-कराड मार्गावर पिंपळीपासून ते अगदी कुंभार्ली घाटापर्यंत रस्त्याला खड्डेच-खड्डे पडले आहेत. यामुळे या भागात छोटे-मोठे अपघातसुद्धा सर्रास घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देत नाही, अशीच परिस्थिती आहे.www.konkantoday.com