आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागूआयटी बदलासाठी टपाल कार्यालयाचे व्यवहार २ ऑगस्टला बंद राहणार

भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. याकरिता २ ऑगस्ट रोजी एक दिवस टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

येत्या ४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी डाक विभागातील दोन्ही प्रधान डाकघरे रत्नागिरी व चिपळूण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये, शाखा डाकघरांमध्ये नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. एपीटीचा उद्देश हा सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही सेवा प्रदान करणे हा आहे.

नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यासाठी प्रणाली पडताळणी व संरचना प्रक्रिया २ ऑगस्ट होणार आहे. त्या दिवशी टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करावे. टपाल सेवा २ ऑगस्ट रोजी एक बंद राहणार असली तरी भविष्यातील सेवा अनुभव अधिक सक्षम व डिजिटल होईल, अशी ग्वाही रत्नागिरी विभागाने व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button