
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर आगारातील पाच नवीन बसचे लोकार्पण
आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून राजापूर एस.टी.आगाराला पाचल नवीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या एस.टी. बसेस उपलब्ध झाल्या असून, त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या नवीन बसेसमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, वयोवृद्ध, नोकरदार नागरिक प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
मागील काही काळापासून तालुक्यातील अनेक मार्गांवर एस.टी.बस ची संख्या अपुरी पडत होती, यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. हे अडचण लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन बसेसची मागणी केली होती, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाच नवीन कोऱ्या बसेस राजापूर आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ.किरण सामंत यांनी बोलताना ‘या नवीन बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार असल्याचे सांगत, जनतेला सुरक्षित व अधिक दर्जेदार प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.