
अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटविण्याबाबत आवाहन
रत्नागिरी, दि. 29 :- गणेशगुळे लाडवाडी येथील संतोश जनार्दन लाड यांनी 17 एप्रिल 2025 रोजी एक अनोळखी मानवी सांगाडा आढळून आल्याची खबर पूर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे दिली आहे. हा मानवी सांगाडा अनोळखी असून त्याचे नाव गाव समजत नाही. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास पूर्णगड सागरी पोलीस ठाणे, पावस येथे 9684708323/9209877706/9022977705 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस हेड कॉ. संतोष करळकर, पूर्णगड सागरी पोलीस ठाणे पावस यांनी कळविले आहे.