
योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत~एकनाथ शिंदे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलीसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली.दुसरीकडे राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याच्या बातम्या देखील सातत्यानं समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर चर्चेला आणखी उधाण आलं, दरम्यान या यादीमध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नेमकं काय म्हणाले शिंदे?योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं, दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यामध्ये योगेश कदम यांचा देखील राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आधीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.