
मिहीर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद!
महाजन बिल्डकॉनचे सर्वेसर्वा आणि युवा सामाजिक कार्यकर्ते मिहीर महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने दाभोळ येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.आपल्या परिसरातील गरजू रुग्ण विशेषत: ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्ण यांना डोळ्यासमोर ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक सतीश भाई टोपरे, सुप्रसिद्ध डॉ.केतकर, डॉ.गोंधळेकर आणि मिहीर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या शिबिरासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम उपस्थित होती. स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, जनरल सर्जन, फिजिओथेरेपिस्ट, कान नाक घसा तज्ञ आदी विभागांचे तज्ञ उपस्थित होते. या सर्व विभागांमधील डॉक्टरांनी संबंधित सर्व रुग्णांचे तपासणी करून ज्यांना आवश्यक त्या सर्वांना बहुतांश सर्जरी मोफत जसे की हृदय बायपास, एंजिओप्लास्टी, मूतखडा, मोतीबिंदू, पित्ताशयातील खडे इ. अनेक शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करून देण्यात येणार आहेत. तसेच अन्य काही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.या शिबिराला रक्त-लघवी तपासणी आणि अन्य चाचण्या यासाठी बिपीन मयेकर यांची अमेय लॅब्रोटरीची टीम उपस्थित होती.बुरोंडी ते दाभोळ पट्ट्यातील बऱ्याच गावांतील रुग्ण १९०+ संख्येने या शिविरासाठी उपस्थित राहिले.शिबिराचे संपूर्ण नियोजन, प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष व्यवस्था यामध्ये कौस्तुभ वैद्य, अविनाश काष्टे,नितीन यादव, शिरीष चव्हाण, अमित नाचरे,विद्याधर जोशी, प्रवीण तोडणकर ,प्रतीक जाधव,संदीप गरंडे , सुमेध करमरकर, आबा वाघमोडे, विवेक भुवड, रोहन झाडेकर , वैभव बहुतुले इ. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मिहीर महाजन यांनी मनोगतात म्हंटले की आतापर्यंत केवळ ओळखीतून आलेल्या पेशंटची आरोग्यव्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करायचो परंतु इथून पुढच्या काळात याला अधिक व्यापक आणि सुसूत्र रूप देण्याचा विचार आमच्या टीमने केला आहे.