
भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी; पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा श्रीनगरमध्ये खात्मा
जम्मू काश्मिरच्या श्रीनगर जवळच्या भागामध्ये असलेल्या दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रामध्ये आज 28 जुलै रोजी भारतीय लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं.ऑपरेशन महादेव अंतर्गत ही कारवाई सुरू होती. ज्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान, यासिर आणि अली या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून, त्यापैकी सुलेमान आणि यासिर पहलगाम हल्ल्यात सहभागी होते.जम्मू काश्मिर पोलीस आणि सीआरपीएफ यांचं हे संयुक्त अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत सुरक्षा दलाने दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन केलं. हा भाग श्रीनगरच्या त्राल या भागाला जोडलेला आहे. डोंगराळ भाग आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरणं निर्माण झालं होतं.दरम्यान याबाबत सुरक्षा एजन्सीजने हे दहशतवादी असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्र दहशतवाद्यांचं मुख्य ठिकाणं मानलं जातं. तसेच त्यांनी नुकत्याचं झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली असल्याचं सांगितलं होतं. या अगोदर देखील भारतीय लष्कराने दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रात दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले होते. त्यात सैन्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता