धामणसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड


धामणसे (ता. रत्नागिरी) – धामणसे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सर्व सदस्यांच्या एकमताने व सौहार्दपूर्ण वातावरणात ही निवड पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. अमर रहाटे होते. निवडीनंतर सौ. ऋतुजा कुळकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

सौ. ऋतुजा कुळकर्णी या सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या नेतृत्ववृत्तीच्या स्त्री असून, गावातील महिला, युवक, वंचित घटकांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग या मूल्यांच्या आधारे ग्रामपंचायतीचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब जिल्हास्तरीय भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरीचे पदाधिकारी तालुकास्तरीय पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे विशेषता आभार मानले.
ग्रामपंचायत धामणसें मध्ये दुसऱ्यांदा निवडून येऊन व आज उपसरपंच होताना त्यांनी आपले कुटुंबीय व पती उमेश कुळकर्णी , वॉर्ड नंबर २ चे सर्व मतदार, ग्रामपंचायत सदस्य सहकारी, व कर्मचारी वृंद यांची त्यांना अशीच साथ मिळावी अशी इच्छा व्यक्त केली.

बैठकीस उपस्थित सदस्य माजी उपसरपंच अनंत जाधव, सौ. वैष्णवी विलास धनावडे, सौ. रेश्मा डाफळे, समीर सांबरे, संजय गोंनबरे, दिपक रेवाळे आणि सौ. सिध्दी कानडे उपस्थित होते.

या सभेला ग्रामसेवक इंगळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. अविनाश लोगडे, विश्वास रहाटे, संतोष जाधव, सूर्यकांत रहाटे, मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, श्री. रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष श्री. अविनाश जोशी, माजी अध्यक्ष शेखर देसाई, विजय लोगडे, गणेश लोगडे, राजेंद्र डाफळे, अनिल जाधव, ग्रामविकास अधिकारी परशुराम इंगळे आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन व समन्वय ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button