
दापोलीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट तीन जणांवर हल्ला, प्रशासन सुस्त
दापोली परिसरात भटक्या कुत्र्यांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत
दाभोळ येथील मुलीवर केलेल्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला 25 टाके पडले होते. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा शहरात तीन लहान मुलींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे. मात्र दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा त्रास वाढत असताना देखील प्रशासन सुस्त असल्याचे खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दापोली एसटी स्टँडजवळील भारत बेकरी परिसरात घडली. बिस्किट घेण्यासाठी घराबाहेर गेलेल्या ९ वर्षीय दिव्या गजानन गिरी या बालिकेवर अचानक एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने तिच्या मांडीला चावा घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. फॅमिली माळ परिसरातील सानिया अब्बास खोत (१५) आणि सिद्रा आमीन नायक या दोन बालिकांवर भटक्या कुत्र्यांनी एकत्रितपणे हल्ला चढवला. त्या दोघी क्लासला जात असताना काही कुत्र्यांनी अचानक पळत येत चावा घेतल्याचे समोर आले. या सर्वांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वाढत्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे दापोली शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.