
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द श्री कुणकेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी
श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यामुळे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द श्री कुणकेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी आहे. दरम्यान शिवभक्तांन सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.यावर्षी श्रावणी सोमवार उत्सवास 28 जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवारपासून सुरुवात होत आहे.28 जुलै त्यानंतर 4, 11 आणि 18 ऑगस्ट अशा चार श्रावणी सोमवारी हा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवा निमित्त कुणकेश्वर मध्ये येणार्या शिवभक्तांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, पार्किंग आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त प्रथम पूजेचा मान प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यात येतो. यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पूजेसाठी मालवणचे प्रसिध्द उद्योजक सुरेश नेरूरकर व कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलक यांना हा मान देण्यात आला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या देवगड आगारामार्फत विशेष बससेवा चालविण्यात येणार असून देवगड, कुणकेश्वर तसेच रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली या एसटी स्थानकांमधूनही कुणकेश्वरसाठी थेट बससेवा उपलब्ध राहणार आहेत