
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर हातगाडी लावण्यावरुन दोन विक्रेत्यांमध्ये मारामारी
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर हातगाडी लावण्याच्या जागेवरून दोन विक्रेत्यांमध्ये शनिवारी मोठा वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्या दोघामध्ये मारमारी तर एकमेकांला चिखलात लोळवण्यापर्यंत प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
काही दिवसापूर्वी चिपळूण नगर परिषद प्रशासनाने शहरात रस्ते त्याबरोबरच गटारांवरील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम हाती घेतली होती. यात प्रामुख्याने मध्यवर्ती बसस्थानकसमोरही हातगाडी व्यावसायिकांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवून कारवाईचा बडगा उगारण्यात आला शिवाय होता. व्यावसायिकांना त्या अतिक्रमण न करण्याची चांगलीच तंबी देण्यात आली होती. यातूनच हा परिसर पूर्णतः मोकळा झाला होता. यांबरोबर त्याठिकाणी अतिक्रमण होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने भले गटार खोदून ठेवले आहे. असे असताना पालिकेने नेमून दिलेल्या जागेपलिकडे हांतगाड्या पुन्हा उभ्या करण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे हातगाड्या उभ्या राहत असताना दुसरीकडे याच हातगाड्या उभ्या करण्याच्या जागेवरून व्यावसायिकामध्ये चांगलेच युध्द रंगू लागले आहेत. अशाच पध्दतीचा वाद शनिवारी दोन व्यावसायिकामध्ये झाला. हातगाडी लावण्यावरून झालेला हा वाद थेट मारामारी तर धक्काबुक्की, शिवाय एकमेकांला चिखलात लोळवण्यापर्यंत पोहचला. केली. काही स्थानिक व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन हा वाद सोडवला.www.konkantoday.com