
चिपळुणात कारला कुंभार्ली घाटात ट्रकची धडक, दोन जखमी
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटातील एका वळणावर कारला ट्रकने धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घड़ली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातानंतर ट्रकचालक पळून झाला. याप्रकरणी त्या ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मोहम्मद जियाद विलायत खान (२०, बहादुरशेख नाका) याने दिली आहे. मोहम्मद याच्यासह नेहा यादव (चिपळूण) या देखील जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद हा त्याच्या कारने कुंभार्ली घाटात फिरण्याकरता गेले होता. तो कुंभार्ली घाटातून तो चिपळूणकडे येत असताना कुंभार्ली घाटातील एका वळणावर आल्यावेळी चिपळूण बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रक चालकाने विरुध्द बाजूला येऊन मोहम्मद याच्या कारला धडक दिली. यात मोहम्मद खान तसेच नेहा यादव दोघेजण जखमी झाले. त्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com