
चारही चार्जिंग स्टेशनचे काम अपुरे गणपती उत्सवात ई-बसेस धावण्याची शक्यता कमीच.
कोकणातील रत्नागिरी आगारात गणेशोत्सवात ई-बसेस येणार असे सांगितले होते. मागील वर्षी ही ई-बसेस रस्त्यावर धावतील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप चारही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही.दापोली, रत्नागिरीचे काम काही प्रमाणात झाले आहे, तर खेड, चिपळूणमध्येे कामाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात ई-बसेस कोकणाच्या रस्त्यावर धावण्याचे शक्यता अद्याप तरी धुसरच दिसत आहे.कोकणातील रत्नागिरी विभागात येत्या गणेशोत्सवात तब्बल 152 नवीन ई-बसेस येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 30 ई बसेस गणेशोत्सवात धावतील, असे सांगण्यात आले होते.