
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले.
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली. या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचाही समावेश होताया पार्टीदरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, दोषी असणाऱ्याला शासन झाले पाहिजे. खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई त्याठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्याठिकाणी त्यांचे समर्थन करणार नाही.
आता एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे पाय खोलात असल्याचे बघायला मिळातंय. थेट काही पावत्याच पुढे आल्या आहेत. यामुळे नाथा भाऊंच्या जावयाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुकिंग करण्यात आल्याचे पावतीवरून दिसत आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख दिसतोय.