
वरवेलीतील सामाजिक कार्यकर्ते आशिष विचारे यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड
आबलोली : गुहागर तालुक्यातील वरवेली गावातील सामाजिक कार्यकर्ते, सिद्धिविनायक मंडळ मराठवाडी वरवेलीचे अध्यक्ष आशिष बाळकृष्ण विचारे यांची भाजप गुहागर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
गुहागर शहरातील चैताली हॉल येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी सभापती लक्ष्मण शिगवण, माजी नगरसेवक गजानन वेल्हाळ, किरण खरे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी, तालुका गुहागरचे अध्यक्ष अभय भाटकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या राष्ट्रनिष्ठ तत्वाला अनुसरून कार्यरत राहणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून आपण समाजहितासाठी केलेल्या कार्यामुळे आपल्या नेतृत्वात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. भविष्यातही आपण असेच प्रेरणादायी कार्य करत राहावं. राष्ट्रसेवेसाठी आपली गुहागर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपणास हे नियुक्तीपत्र प्रदान करीत आहोत. लोककल्याणासाठी राष्ट्रहित हेच सर्वोच्च मानून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्या कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेले आशिष विचारे हे क्षत्रिय मराठा समाज गुहागरचे कार्यकारी सदस्य आहेत. या अगोदर ते तालुका कार्यकारी सदस्यपदी होते. आता त्यांची तालुका उपाध्यक्ष निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.