
रत्नागिरीत ना. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’
रत्नागिरी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांसोबत बसून ऐकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतात. यामध्ये देशांतर्गत विविध मुद्द्यांवर भाष्य करताना भारत देशाची होणारी प्रगती, देश विकासासाठी हातभार लावणारे नागरिक सैनिक यांचा उल्लेख करत असतात. त्यांच्या या मन की बात कार्यक्रमातून नेहमी देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची सुतोवाच ते करत असतात.
हा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम ना. नितेश राणे यांनी भाजपाच्या रत्नागिरी कार्यकर्त्यांसोबत ऐकला. माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या घरी हा कार्यक्रम त्यांनी ऐकला त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, प्रतीक देसाई, राजू भाटलेकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.