
माजी मत्स्यशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांचा सकारात्मक पुढाकार: मा. ना.नितेश राणे (बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री) यांना निवेदन-
महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि माजी मत्स्यशास्त्र पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मत्स्यशास्त्र पदवीधर विद्यार्थ्यांनी मा. ना.नितेश राणे (बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री) यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी रचनात्मक मागण्यांचा समावेश असून, त्याद्वारे या क्षेत्राला नवीन दिशा देण्याची विनंती करण्यात आली आहे.
१.मुख्यमंत्री मोहदयच्या १०० दिवशी कार्यक्रम अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाचा आकृती बंध नव्याने निर्माण किंवा सुधारित करून सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती जास्तीत जास्त पदांची करावी.नवीन आकृतीबंधानुसार सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदांसाठी 100% भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची विनंती आहे. यामुळे मत्स्य व्यवसाय विभाग अधिक सक्षम होईल आणि माजी मत्स्य शास्त्र पदवीधरांना त्यांच्या तज्ज्ञतेचा उपयोग करण्याची संधी मिळेल.
२.मत्स्य सहाय्यक आणि मत्स्य निरीक्षक पदांची निर्मिती: मत्स्य व्यवसायाला कृषी समान दर्जा मिळाल्याने त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात विस्तारत आहे. यामुळे तज्ज्ञ पदवीधरांची गरज वाढली आहे. त्यानुसार मत्स्य सहाय्यक आणि मत्स्य निरीक्षक या नवीन पदांची निर्मिती करून त्यांची भरती करण्याची मागणी आहे, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
३.रिक्त सहाय्यक अध्यापक पदांची पूर्तता: रत्नागिरी, उदगीर आणि नागपूर येथील मत्स्य महाविद्यालयांमधील रिक्त सहाय्यक अध्यापक पदे तातडीने भरण्याची मागणी आहे. यासाठी कृषी आणि मत्स्य विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच मत्स्य विज्ञान विद्यापीठाला आवश्यक सूचना द्याव्यात, असे निवेदनात नमूद आहे.
४.नवीन मत्स्य महाविद्यालयांचे काम आणि सहाय्यक अध्यापक भरती: देवगड, मोर्शी आणि पालघर येथे प्रस्तावित मत्स्य महाविद्यालयांचे बांधकाम लवकर पूर्ण करून तेथील सहाय्यक अध्यापक पदांच्या भरतीस गती देण्याची विनंती आहे. यामुळे नवीन पिढीला दर्जेदार मत्स्यशास्त्र शिक्षण मिळण्यास मदत होईल.
मा. ना. नितेश राणे यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. माजी मत्स्यशास्त्र पदवीधरांच्या या मागण्यांमुळे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला नवीन गती मिळण्याची आणि तरुणांना संधी मिळण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.