
भाजप शहर कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीस पदी संदीप सुर्वे आणि निलेश आखाडे
रत्नागिरी : आज भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर कार्यकारणी दादा ढेकणे यांनी जाहीर केली.
भाजपचे संघटन कार्यकारणी गठन सुरू असून आज भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, युवा प्रदेश सचिव विक्रम जैन, माजी शहर प्रमुख राजन फाळके, ज्येष्ठ पदाधिकारी मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, माजी नगरसेवक समीर तिवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहरातील नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
संघटन बळकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मार्गदर्शन केले नवीन पदाधिकारी जे पदानुसार काय काम असेल हे थोडक्यात सांगितले. ही कार्यकारणी सर्वसमावेशक असून, महिला, सर्व समाजातील पदाधिकारी, यांना प्रतिनिधित्व देत नवीन शहर कार्यकारिणी करण्यात आली आहे.
भाजपाची शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे:
शहराध्यक्ष: परशुराम (दादा) प्रभाकर ढेकणे.
सरचिटणीस: संदीप (बाबु) प्रभाकर सुर्वे, निलेश महादेव आखाडे.
उपाध्यक्ष: नितीन लक्ष्मण जाधव, नितीन कीर्तीलाल गांगण, सौ. सुप्रिया संदीप रसाळ, संतोष बळवंत सावंत, शैलेश लक्ष्मण बेर्डे, संकेत सुगंध चवंडे.
सचिव: सचिन सुरेश गांधी, मंदिरा मंदार भोळे, जितेंद्र जयवंत जाधव, सौ. शोभा सूर्यकांत झिरोळे, समीर अब्दुल वस्ता, सौ. कामना अरुण बेग.
कोषाध्यक्ष: सोनाली आंबेकर
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी संघटनाबाबत मार्गदर्शन करताना जबाबदारीने पक्षाचे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची लक्षणीय उपस्थिती या बैठकीत जाणवली.
कार्यक्रमात नवीन पक्षप्रवेश :
भारतीय जनता पार्टी नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक लोक भाजपमध्ये पक्ष प्रवेश करताना दिसून येत असून आजच्या या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमात अनेकांनी पक्षप्रवेश केला. यात गुरुनाथ नारायण सामंत, परविन अहमद आंबेडकर, विजया सदानंद भाटकर, शमी शैलेश हरचेकर, शैलजा परिवार, पल्लवी मंगेश भोसले, प्रशांत घाणेकर आदींचा समावेश आहे. भाजपच्या संघटनात्मक कार्यात आणखी बळकटी येण्यासाठी ही कार्यकारिणी मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास शहर अध्यक्ष दादा ढेकणे यांनी व्यक्त केला.