
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री संजय भावे यांना मानद कर्नल कमांडंट (एनसीसी) पद बहाल…..
दापोली:-* संरक्षण मंत्रालयाने दापोली येथिल डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू संजय भावे यांना त्याच्या एनसीसीतील केलेल्या कार्याची दखल घेऊन कर्नल कमांडंट (एनसीसी)हे मानद झालेल्या कार्यक्रमात सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले.
एनसीसी चे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर.के पेडणेकर व कराड येथिल एनसीसी चे कमांडीक ऑफीसर सत्यशिल बाबर यांनी या पदाच्या फीती डाॅ.भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरला लावल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची तसेच विद्यापिठाचे कुलसचिव, संचालक,अधिकारी उपस्थित होते याच कार्यक्रमांला उपस्थित राहुन दापोलीच्या वतीने श्री संजयजी भावे यांचे अभिनंदन करताना नगराध्यक्ष सौ कृपा घाग,को.कृ.विद्यापीठ सिनेट सदस्य सुनिल दळवी,जिल्हानियोजन माजी सदस्य निलेश शेठ,सिनेट सदस्य संदीप राजपुरे,दिनेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.




