
गणपती स्पेशल गाड्यांची प्रतीक्षा यादी एक हजार पार, चाकरमान्यांच्या पदरी निराशा.
गणेशोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले असतानाच मध्य आणि पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षणही काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाले. यामुळे चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. प्रतीक्षा यादी एक हजार पार पोहचल्याने चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता आता सतावत आहे. रेल्वे प्रशासनाने आणखी जादा स्पेशल गाड्या सोडून गणेशभक्तांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवासाठी मुंबई-ठोकूर, मुंबई-सावंतवाडी, बांद्रा -रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी गणपती स्पेशल गाड्यांच्या ३४ फेर्या जाहीर केल्या आहेत. २३ जुलैपासून चारही गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटातच गाड्या हाऊसफुल्ल होवून प्रवाशांच्या हाती प्रतीक्षा यादीवरीलच तिकिटे पडली.www.konkantoday.com