अखंड राज्यात अस स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन आम्ही पाहिलं नाही- प्रदिप भाटकर,अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन

गेली 50वर्ष कॅरम खेळाच्या माध्यमातून राज्य आणि बाहेर आम्ही विविध स्पर्धेच्या माध्यमातून जात असतो मात्र जैतापूर च्या या मंडळासारखं आयोजन आणि नियोजन आम्ही कुठेही पाहिलं नाही, हे एकमेव मंडळ ज्यांनी जनरेटर वर ही स्पर्धा आयोजित केले असे कौतुकास्पद उदगार रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपजी भाटकर यांनी काढले.
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जैतापुर आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान चषक भव्य कॅरम स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशपाकशेठ हाजु यांच्या हस्ते तर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आणि वारकरी संप्रदाय अध्यक्ष रविंद्रजी नागरेकर, जिल्हा कॅरम असोसिएशन अध्यक्ष प्रदिप भाटकर,असोसिएशन पदाधिकारी,शिवसेना पदाधिकारी, यांच्या मोठ्या उपस्थितित पार पडला.

त्यावेळी *जिल्हा कॅरम असोसिएशन खजिनदार नितीन लिमये, सेक्रेटरी मिलींद साप्ते,राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर,सहपंच सागर कुलकर्णी, सदस्य विवेक देसाई, दोन वेळा कॅरम विश्व उपविजेता, आरसिएफ कप विजेता, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू रियाज अकबर अली, राज्यविजेता खेळाडू अभिषेक चव्हाण, कॅरमपटू राहूल भस्मे, एकनाथ पाटील गुरुजी, जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, मनोज आडविरकर,राजाराम पारकर, भाई कणेरी,बंड्या चव्हाण, नवनाथ शेलार, सिद्धी शिरसेकर, जानवी गावकर, राजेंद्रप्रसाद राऊत,समिर शिरवडकर,राजन कोंडेकर,वैभव कुवेसकर, सरफराज काझी,प्रसाद पंगेरकर,विजय कुनकवळेकर, विलास अवसरे,सत्यवान आडिवरेकर, रमेश राणे, शशांक शिरवडकर, नवनाथ शेलार, सुनिल जाधव,जितेन्द्र गावकर, समीर पावसकर, नासिर काझी, जलाल काझी, मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते तसेच राजा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button