
सैराट फेम आर्ची झाली टाळसुरेच्या शाळेत शिक्षिका, विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या दापोली तालुक्यातील टाळसुरे गावाच्या प्रेमात पडली आहे. मराठी चित्रपटाच्या शुटींगनिमित्ताने ती टाळसुरे जिल्हा परिषद शाळेत पोहोचली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शिक्षणाचे महत्व पटवून दिले. यावेळी तिने केलेल्या शिक्षणाच्या गोष्टी, नदीवरील चित्रिकरणाचे क्षण गावासाठी खास होते.सैराट फेम रिंकू राजगुरूने तमाम मराठी जनांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी अनेकजण आतूर असतात. मात्र तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ही संधी स्वतः रिंकू राजगुरून उपलब्ध करून दिली. एका मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी रिंकू राजगुरू दापोलीत आली होती. भर पावसात चक्क रिंकू राजगुरू आपल्या गावात शिक्षिकेच्या वेशात आलेली पाहून कुणाच्याही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रिंकू राजगुरूने टाळसुरे गावातील जिल्हा परिषद शाळा गाठली, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.www.konkantoday.com