
गणपती स्पेशल गाड्यांच्या नियोजनातील त्रुटी दूर करा, कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी.
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर गणपती स्पेशलच्या फेर्या जाहीर करून गणेशभक्तांना दिलासा दिला असला तरी गाड्यांच्या नियोजनात आढळून आलेल्या त्रुटी दूर करून चाकरमान्यांना दिलासा द्यावा, असे साकडे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे रेल्वे बोर्डाला घातले आहेत. रेल्वेगाड्या मध्य रेल्वे व दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसईपर्यंत चालवाव्यात अशी आर्जवही केली आहे.चिपळूणसाठी केवळ ८ डब्यांची मेमू स्पेशल जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण अनारक्षिक स्पेशलचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातीलच प्रवाशांना होती. त्यापुढील स्थानकात स्पेशलमध्ये चढताच येत नाही. यंदाच्या गणेशोत्सवात जाहीर केलेली दिवा-चिपळूण मेमू स्पेशल म्हणजे कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.मुंबई ते कल्याण या ५५ कि.मी.च्या मार्गावरही १५ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ कि.मी.साठी ऐन गणेशोत्सवाच्या गर्दीच्या हंगामात ८ डब्यांची गाडी चालवण्याची कल्पना पूर्णतः चुकीचीच असल्याचे निवेदनात म्हटले आहे.www.konkantoday.com