
संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन, ऍड. अमेय परूळेकर यांचा दावा.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना नुकतीच पार पडली होती. या प्रभाग रचनेत रत्नागिरीतील ऍड. अमेय परूळेकर यांनी हरकती उपस्थित केल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानातील अनुच्छेद १४ मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप परूळेकर यांनी घेतला आहे. यासंबंधी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे.
ऍड. परूळेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवेदनानुसार, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५५ गटांची प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रभाग पुनर्रचनेत ६२ जि.प. गट करण्यात आले. मात्र १४ जुलै रोजी झालेल्या प्रभाग रचनेत जि.प. गटांची संख्या ६ ने कमी झाली आहे. तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गणांची संख्या २०१७ मध्ये ११० होती. यानंतर ती १२४ करण्यात आली. मात्र पुन्हा त्यात बदल करून गणांची संख्या १२ ने कमी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गटांसाठी वेगवगळे आरक्षण पडत असते. १४ जुलै २०२५ रोजी परत रत्नागिरी जि.प. ची प्रभाग रचना जाहीर केली गेली.
म्हणजे ही प्रभाग रचना कायम राहिली. आता जे उमेदवार रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक लढणवतील व प्रचार करतील त्यांना आधीची प्रभाग रचना सोडून नवीन प्रभाग रचनेनुसार प्रचार करावा लागेल व निवडणूक लढवावी लागेल. म्हणजे आधीचे उमेदवार व आता जे निवडणूक लढवणार त्या उमेदवारांत भेदभाव होणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकराचे उल्लंघन होणार असल्याचे परूळेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.www.konkantoday.com