श्रीमती पार्वती शंकर बापट काशिनाथ महाविद्यालय, वाटप खंडाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडून श्रीमती पार्वती शंकर बापट काशिनाथ महाविद्यालय, वाटप खंडाळा येथे दिनांक २४/०७/२०२५ रोजी विविध कायद्याबाबत साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव, श्री. आर. आर. पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. आढाव, सचिव श्री. बोरकर मुख्याध्यापक श्री. जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व लोकअभिरक्षक कार्यालयातील वकील श्री उन्मेष मुळये उपस्थित होते.

या प्रसंगी अॅड उन्मेष मुळये यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण चा बालकांबाबतची योजना २०२४ विषयी मुलांना माहिती दिली तसेच बालकांचे हक्क, शिक्षणाचा हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

श्री. आर. आर. पाटील यांनी मनोगतात बालकांविषयी असलेल्या कायदेविषयक तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. बाल न्यायमंडळ, जिल्हा बालकल्याण समिती यांचे कार्य, विधी संघर्षीत बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांविषयी तरतूदींची माहिती दिली. बालंकावरील अन्याय, अत्याचार निवारण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बालकांसाठी विधी सेवा पुरविणारे पथक स्थापन झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत जातीभेद न पाळण्याचे व धार्मिक विद्वेष न वाढविण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असल्याचे कथन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button