
शोकांतिका: नायगावमधील नवकार इमारतीतून चार वर्षांच्या अन्विकाचा पडून मृत्यू
पालघर जिल्ह्यातील नायगाव (पूर्व) येथील नवकार इमारतीमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली. चार वर्षांची अन्विका प्रजापती या चिमुरडीचा १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
सदर घटना घरातून बाहेर जाण्याच्या तयारीदरम्यान घडली. अन्विकाला तिच्या आईने काही वेळासाठी घरातील चप्पल स्टँडजवळ बसवले होते. यावेळी ती अचानक उठून खिडकीजवळच्या शू-स्टँडवर बसली. काही क्षणांतच तिचा तोल गेला आणि ती थेट १२व्या मजल्यावरून खाली कोसळली.
ही संपूर्ण घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.