
रस्त्यावर पकडलेल्या मोकाट गुरांचे मालकच येत नसल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद अडचणीत.
रस्त्यावरील मोकाट गुरे पकडण्यासाठी मोर्चे, आंदोलने रत्नागिरीत झाली. शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला. यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने ६४ गुरे पकडली. मात्र या गुरांचे मालक आपली जनावरे सोडून घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता पालकमंत्र्यांनी भुशीची १०० पोती दिल्याने गुरांचा प्रश्न काहीसा हलका झाला आहे.रत्नागिरी शहरात ३०० हून अधिक जनावरे मोकाट फिर आहेत. असे एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना भेटून मोकाट जनावरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यानंतर प्रशासनाने ६३ गुरे पकडून पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवली.
प्रशासनाने गुरांच्या लिलावासाठी दोन वेळ प्रक्रिया राबवली, परंतु कोणीही इच्छूक व्यक्ती पुढे आली नाही. पकडलेल्या गुरांना सोडून नेण्यासाठी मालकांपैकी कोणीही पुढे आला नाही. यामुळे पकडलेल्या गुरांची देखभाल करण्याचे काम नगर परिषद प्रशासनावर पडले आहे. नगर परिषदेचे कर्मचारी या गुरांची देखभाल करत आहेत. शहरातील चंपक मैदान येथील जागेत नगर परिषदेने पत्र्याची शेड उभारली होती. त्या शेडचा वापर कोंडवाडा म्हणून करण्यात येत आहे.www.konkantoday.com