
मुद्रांक शुल्कच्या अभय योजनेला २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.
ज्या लोकांनी नोंदणी व मुद्रांक विभागाकडे दंड भरला नही किंवा त्रुटींची पूर्तता विहित मुदतीत केलेली नाही, अशा लोकांसाठी सरकारने अभय योजना काढली आहे. या योजनेला २० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यांचा लाभ राज्यातील १३ हजार ५६६ प्रकरणांना होणार आहे.
मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी मुद्रांक विभागाने अभय योजना २०२३ लागू केली. ही योजना सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्याविषयी निर्णय होवू शकला नाही. आता २० ऑगस्ट २०२५ पर्यंत या योजनेखाली लोक लाभ घेवू शकणार आहेत. दंड भरण्याची नोटीस मिळाली नाही. त्रुटींची पूर्तता केलेली नाही, अशा लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे.www.konkantoday.com