
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत २२ रूग्णांना मिळाला १७.३० लाखांचा मदतीचा हात.
अचानक उदभवणारे गंभीर आजार किंवा अपघात यामुळे कुटुंबांना मोठ्या वैद्यकीय खर्चाला सामोरे जावे लागते. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे योग्य उपचार घेणे कठीण होते. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरू झालेल्या या कक्षाने आतापर्यंत २२ रूग्णांना तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर दि. २ मे २०२५ रोजी या कक्षाचे उदघाटन झाले. मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष जिल्ह्यातील अनेक गरजू आणि आर्थिक दुर्बल रूग्णांसाठी खर्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. गंभीर आजार किंवा अपघातग्रस्त कुटुंबाना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च करावा लागतो. अशा गरजू कुटुंबाना हा कक्ष आर्थिक पाठबळ देत आहे.www.konkantoday.com