
भर पावसात रत्नागिरी नगरपालिकेच्या नळ पाणी योजनेच्या फुटक्या पाईपलाईनचे पाणी राम नाक्यावर
रत्नागिरी शहरातील एकीकडे एका बाजूने काँक्रीटचे रस्ते झाले असून दुसऱ्या बाजूने अजूनही काँक्रिटीकरण झालेले नाही या भागातून रत्नागिरी नगर परिषदेची पाईपलाईन गेली आहे ज्या भागात रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले आहे त्या भागात जिथून नव्या पाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे त्या ठिकाणचा भाग डांबरीकरण करण्यात आला आहे.
मात्र या नव्या पाणी योजनेचे पाईप वारंवार फुटत असून हे पाईप जोडण्यासाठी नगर परिषदेचे पथक कायमस्वरूपी पाईपचे तुकडे घेऊन फिरत असतात काल रत्नागिरी शहरातील राम आळी नाक्यावरील संतोष इलेक्ट्रॉनिक जवळ रत्नागिरी नगर परिषदेचा पाणी योजनेचा पाईप पुन्हा फुटला त्यामुळे भर पावसातही रत्नागिरी नगर परिषदेच्या फुटलेल्या पाईपाच्या पाण्याची भर पडून त्या ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.
