पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा


रत्नागिरी, दि. २५ : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वाजता पाली निवासस्थान येथे राखीव (स्थळ : पाली ) दुपारी १२ वाजता पडवे, ता. गुहागर येथील ग्रामस्थांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी) दुपारी १.३० वाजता राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, माळनाका ) दुपारी ३ वाजता उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा – २०२५ : करबुडे जि.प. गट येथे भेट (स्थळ : दत्तकृपा मंगल कार्यालय, जाकादेवी ) दुपारी ४ वाजता वाटद MIDC समर्थनार्थ मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : सर्वसाक्षी हॉल, खंडाळा) सायंकाळी ७ वाजता श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सवानिमित्त बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवार दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मिरकरवाडा मासेमारी बंदर येथील विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ : मिरकरवाडा बंदर, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व प्रसिद्ध व्याख्यातांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह ) दुपारी १२ वाजता शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सव संगमेश्वर कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : मराठा भवन, देवरूख) दुपारी १२.३० वाजता महा आवास अभियान सन २०२४- २५ अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना व घरकुल लाभार्थ्यांना कार्यक्षमतेने यशस्वी अंमलबजावणी केल्याबाबत पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ : पंचायत समिती हॉल, देवरुख ) दुपारी ३.३० वाजता पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : खारवी समाज भवन, हेदवी, ता. गुहागर) सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button