
दुरूस्ती आणि रंगरंगोटीसाठी लाखो रुपये वाया वापराविना इमारत पडून
राजापूर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये गटविकास अधिकारी, बांधकाम उपअभियंता यांच्या निवास्थानांसह कर्मचार्यांना राहण्यासाठी निवासस्थाने अनेक वर्षापूर्वी बांधलेली आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून या इमारतींची दुरूस्ती आणि रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीमध्ये सद्यस्थितीमध्ये कोणीही निवास करीत नाही वा त्या इमारतींचा प्रशासकीय कामासाठी फारसा उपयोग होत नसल्याने केलेला वायफळ सरकारी खर्च कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागाचा कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून पाहिला जतो. या पंचायत समितीची सद्यस्थितीमध्ये प्रशासकीय इमारत असली तरी सर्व प्रशासकीय दालने एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीची गेल्या कित्येक वर्षापासून पंचायत समितीला प्रतिक्षा राहिलेली आहे.
www.konkantoday.com