
दिल्लीत झालेल्या परिषदेत शेतकरी अविनाश काळे यांनी कोकणात होणार्या माकडांच्या उपद्रवाचा प्रश्न मांडला
ऑर्गनायझिंग कमिटी फोर्मस अँड फॉरेस्ट डवेलर्स पार्लमेंट यांचे अध्यक्ष कोट्टायम केरळचे खासदार फ्रान्सीस जॉर्ज आणि जनरल मॅनेजर जॉन यांनी देशभरात होत असलेल्या वन्यजीव उपद्रवाबाबत देशातील शेतकरी, किसान संघटना, खासदार, सामाजिक कार्यकर्ते यांना त्यांच्या भागातील वन्यजीव उपद्रव या बाबत चर्चा, सूचना करण्यासाठी २२ जुलै रोजी आमंत्रित केले होते. ही परिषद दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या इमारतीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेले रत्नागिरीचे कार्यकर्ते अविनाश काळे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील वानर व माकडांच्या उपद्रव प्रकरणाबाबत आपले मत मांडले.
काळे म्हणाले, आपल्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वानर माकडांचा गंभीर प्रश्न दिल्लीत मांडता येईल यासाठी मी तिथे उपस्थित राहिलो. तिथे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये असलेला वानर माकडांचा प्रचंड उपद्रव त्यामुळे शेतकर्यांना येणारी उद्विग्नता, आंबा राखणीसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा फालतू खर्च, सरकारकडून नुकसानभरपाई बाबत होणारी थट्टा, त्यातील त्रुट, अडचणी, उपद्रवाला कारण त्याची वाढलेली प्रचंड संख्या, त्यासाठी कायमचा बंदोबस्त हा उपाय हवा. शेती सुरक्षित असण्यासाठी नाईलाजाने शेतीमध्ये नुकसानीसाठी आलेला वन्यजीव मारण्याचा मुलभूत अधिकार मिळायला हवा किंवा सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा. देशाचे पोट भरणारा शेतकर्याचा जीव महत्वाचा की अतिरिक्त संख्या वाढलेला वन्यजीव महत्वाचा? यामध्ये शेतकरी आधी जगायला हवा.www.konkantoday.com