
दापोली तालुक्यातील महत्वाच्या समुद्रकिनारे, धबधब्यांवर राहणार पोलिसांची नजर.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दापोलीतील महत्वाच्या समुद्रकिनार्यांवर व धबधब्यांच्या ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामपंचायतींना सुचना फलक लावण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे दापोली पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.तालुक्यात पावसाळ्यातही समुद्रकिनार्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत. स्थानिकांच्या सूचनांनाही ते जुमानत नाहीत. दापोली पोलिसांकडून वेळोवेळी समुद्रकिनार्यांकडे लत्र असते. परंतु धबधब्यांवरही लक्ष ठेवणे आता आवश्यक बनले आहे. शिवाय ग्रामपंचायतीनीही समुद्रकिनार्यांसह धबधब्यांवर सूचक फलक लावणे गरजेचे आहे.www.konkantoday.com