
जीजीपीएसच्या चिमुकल्यांनी साजरा केला ‘पावसाळी दिवस’.
रत्नागिरी : पावसाची सुरुवात झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो. पण सर्वांत जास्त आनंद होतो तो “ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा” असं म्हणणाऱ्या लहान मुलांना आणि शेतकऱ्यांना. पावसात भिजण्यासाठी सर्वात आतुर असतात ती लहान मुले. म्हणूनच “जीजीपीएस”च्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी विभागाने विद्यार्थ्यांसोबत ‘पावसाळी दिवस’ साजरा केला. मुलांच्या रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोटने सर्व वातावरण इंद्रधनुष्यासारखे रंगबिरंगी झाले होते. पावसाच्या रिमझिम सरीत ‘सांग सांग भोलानाथ’ गाण्याचा आनंद लुटत, डबक्यात उड्या मारत, पाण्यात कागदी होड्या सोडत मुलं पावसात चिंब झाली.सर्दी, खोकल्याची परवा न करता मुलांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी पालकांनी देखील तितकाच छान प्रतिसाद शाळेला दिला. मुलांसोबतच शिक्षकांनी देखील पावसात भिजण्याचा आनंद लुटला. हा पावसाळी दिवस साजरा करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या सौ. अपूर्वा मुरकर, प्री प्रायमरी विभागाच्या सौ. शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकांच्या कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.