जिल्ह्यात अजूनही २ लाख ८५ हजार ७९५ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी नाही.


शिधापित्रकेची (रेशनकार्ड) ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आता दि. ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देसानुसार अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थीनी या मुदतीत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद होवू शकतो. जिल्ह्यात अजूनही २ लाख ८५ हजार ७९५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी झालेले नाही.
अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, या दृष्टीने बोगस लाभार्थींचा शोध घेण्याच्या उद्देशाने शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. त्यासाठी आता रेशनकार्डवरील सर्वच सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार आधारित ओटीपी किंवा बायोमेट्रीक प्रमाणपत्रीकरण प्रदान करणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button